जगण्याचा संघर्ष हा तसा नेहमीचाच. सगळ्यांच्याच वाट्याचा. चुकत कोणालाच नाही. पण आजच्या तथाकथित पुढारलेल्या जगात अजूनही स्त्रियांना जेव्हा विचित्र वागणूक, विचित्र नजरा सहन कराव्या लागतात तेव्हा खरोखर काहीच उमगेनास होतं. आपण फक्त बाहेरुन बदललोय.. मानसिक वृत्ती काही सुधारायच्या बेतात दिसत नाही. कदाचित कधीच नाही बदलणार. एक उपभोग्य वस्तू यापलीकडे काहीतरी अस्तित्त्वाला अर्थ यावा असं वाटणं यात काय गैर आहे? व्यक्तीस्वातंत्र्य ही फक्त बोलाचीच कढी असल्यासारखं वाटत राहतं. अजूनही so called metropolitan शहरात सुशिक्षित (!) लोक आजूबाजूला असतानाही एक स्त्री म्हणून मुक्तपणे, स्वतंत्रपणे, निर्भयतेने जगता येत नाही हेच खरं. काही दिवसांपूर्वी गुवाहाटी मध्ये घडलेल्या ओंगळवाण्या प्रवृत्तीचे विकृत दर्शन घडवणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक पोस्टर पाहण्यात आलं होतं.
हा सोनियाचा दिन कधी उगवणार आहे काय?
हा सोनियाचा दिन कधी उगवणार आहे काय?