बर्याच वर्षांपूर्वी ॐ नम: शिवाय, श्रीकृष्ण, विष्णू पुराण आदी खूप मन लावून नियमितपणे मीही बघितल्या आहेतच. आज मात्र त्यावेळी ज्या भक्तीभावाने बघितल्या होत्या त्या भक्तीचा, किंवा निरागस विश्वासाचा कुठेही मागमूसही शिल्लक राहिला नाहीय अस प्रकर्षाने जाणवलं. कारणमीमांसा करायचीच झाली तर -- १) जास्त शिकल्यामुळे शिंग फुटली आहेत, बाकी काही नाही. २) आजकालच्या पिढीचं काय करावं हेच समजत नाही हो.. सगळे असलेच.. जरा रोज देवासमोर हात जोडून शांत बसा म्हटलं तर ऐकायची सोय नाही. देवाची सुद्धा खिल्ली उडवायला कमी करत नाहीत ही आजकालची पोरं... इत्यादी इत्यादी विधानांपैकी कुठलही एक चिकटवून टाका बिनधास्त!
पण खरंच, अशा मालिकांतून जे चित्र उभं करतात त्यातून इतके भयंकर प्रश्न पडतात की बस्स.
- या सगळ्या देवांना (अन दानवांना सुध्दा) रात्रंदिवस तो भरजरी पोषाख आणि दागिने घालणं बंधनकारक असतं का? सगळेजणं आपले सदैव कुठल्यातरी लग्नकार्याला निघाल्यासारखे नटलेले. बरं तरं बरं, बायकांची अवस्था म्हणजे आणखी वाईट. असल्या make up मधे रडायला पण लावतात. पण आज तर height च झाली. वामनाचा जन्म झाल्या झाल्या दुसर्या मिनिटाला त्याची आई मस्त टकाटक! (पूर्ण make up मधे with all accessories.. I mean jewellery and all...) अर्थात हा त्या मालिकेच्या दिग्दर्शकाचा प्रश्न आहे म्हणा. देव जर खरच अस्तित्वात असेल तर त्यालाही असले प्रश्न नक्कीच पडत असणार.. अगदी शंभर टक्के!
- या सगळ्या देवांच्या आणि दानवांच्या hairstyle आणि कपड्यांमधे प्रचंड फरक. देवांचे (आणि देव्यांचे :-)) पोषाख सगळे पांढरे, bright आणि fresh रंगांचे. आणि दानवांचे मुख्यतः काळपट आणि गडद. हा significant difference खरच असेल का हो? हा दानवांवरती अन्यायच नाही का?
- हे सगळे ऋषी मुनी म्हणा, देव म्हणा, चौकात भाजीला चालल्यासारखे ’काही नाही, जरा स्वर्गात जाउन येतो’ अस सहज म्हणून गेल्यासारखे सगळीकडे हिंडत असतात. चहाला कैलासावर तर नाश्त्याला वैकुंठात. मजाच असते!
- काही देव/ऋषी either मृगजिनावर किंवा वाघाच्या/ बिबट्याच्या कातडीवर बसलेले असतात म्हणा किंवा त्यापासून बनवलेले वस्त्र परिधान करत असतात. आजकालच्या युगात ते जर असते तर मनेका गांधीनी नक्कीच case ठोकली असती त्यांच्या विरुद्ध.
- कधी कधी वाटतं, की एखादा राक्षस चुकून रागाच्या भरात ’हे मूर्ख’ वगैरे संस्कृतोद्भव शिव्या देण्याच्या ऐवजी ’u ediot' असं म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- दानवांची शस्त्रही जाणवण्याइतपत वेगळी असतात बरं का देवांपेक्षा! एखाद्या राक्षसाची तलवार बघा आणि देवाची बघा. उत्तर मिळेल. उत्तराच्या पाठीमागचं कारण मीच अजून शोधते आहे.
- सगळे देव handsome आणि देव्या beautiful category त, तर दानव शक्य तितके विकृत, विचित्र दाखवले जातात. याला एकही अपवाद सापडणार नाही. बघा शोधून. म्हणजे देवत्व आणि दानव्य हा केवळ physical appearance वरच ठरतो की काय? एखाद्या चांगल्या चेहर्याच्या मागे दुष्ट/ क्रूर चेहरा लपलेला असू शकतो ही शक्यता कुठेच consider केली जात नाही. हा दोष कुणाचा?
बरं हे तर झाले मालिकारुपी चित्र उभं करतानाचे दोष. पण आणखी काही technical प्रश्न बरेच आहेत.
- जेव्हा पृथ्वी समुद्रात बुडवली होती, तेव्हा विष्णूने अवतार घेउन तिला वाचवलं. आता जर पाणी फक्त पृथ्वीवरच अस्तित्त्वात आहे, तर हा आख्खाच्या आख्खा समुद्र आला कुठून? तो आहे कुठे? म्हणजे जर पृथ्वी बुडेल इतका जर समुद्र अस्तित्त्वात असेल तर तो आपल्याला सापडल्याशिवाय राहिला असता का?
- जर देवाला भविष्यातलं कळतं, तर मग दानवांना वरदान देण्याच्या आधीच काळजी का नाही घेत? बरं एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, पण देवही अशा चुका सारख्याच करताना दिसतात. मग आपल्यसारख्या बापुड्या मनुष्यप्राण्याच्या हातातून चुका झाल्या तर त्यात नवल ते काय?
- कृष्णाला खरंच अर्जुनाला भगवद्गीता समजावून सांगण्याइतका वेळ कुरुक्षेत्रावर मिळाला? तोवर बाकीचे लोक करत काय होते? मालिकेमधे दाखवताना सोयीसाठी म्हणून मागचे सगळे लोक ’pause’ status मधे दाखवतात. प्रत्यक्षात असं थोडंच असेल?
P. S. कृपया हा लेख वाचून माझ्या आस्तिकते/नास्तिकते बद्दल शंका काढू नका. जे मनात आहे ते मांडलंय इतकंच. अर्थात १००% आस्तीक माणूसही या शंकांचे योग्य प्रकारे निरसन करु शकेल की नही याबद्दल माझ्या मनात शंकाच आहे.
1 number!! mi pan comment muddesood lihito ata : -
ReplyDelete1."वामनाचा जन्म झाल्या झाल्या दुसर्या मिनिटाला त्याची आई मस्त टकाटक! (पूर्ण make up मधे with all accessories.) - he wakya wachun hasun hasun gadabada lollo.. lolzzz
2.Dev-danavanchya shastran madhla farak - good observation
3."चांगल्या चेहर्याच्या मागे दुष्ट/ क्रूर चेहरा लपलेला असू शकतो ही शक्यता" - ha vichar khupach awadla. asa vichar hya malika baghtana kadhi dokyat ala navta.
sahi...
ReplyDelete:) chaangale observations ahet aani lekh suddha chaan lihala aahes...
ReplyDeletepun malaa vaatta ki haa prastutikaranaacha mudda aahe. pauraanik serials madhye je daakhavle jaate te tya team cha interpretation ahe aani tyaantle majedaar interpretations tu khoop neet observe kele ahes aani ithe maandle aahes.
pauraanik katha matra khoop bodhkaarak vaattaat mala. tyaat kay lihile aahe, kay suchavle aahe haa ek research cha vishay tharel, nakkich. mhanje hyaach serials madhye je dakhavle ahe tyavar vichaar karnyasaarkha khoop kahi ahe.
for eg. tu lihila aahes - "हे सगळे ऋषी मुनी म्हणा, देव म्हणा, चौकात भाजीला चालल्यासारखे ’काही नाही, जरा स्वर्गात जाउन येतो’ अस सहज म्हणून गेल्यासारखे सगळीकडे हिंडत असतात. चहाला कैलासावर तर नाश्त्याला वैकुंठात. मजाच असते! " (hahaha...lihila best ahe :D)
ithe aapan zara muktapane vichaar kela tar ek possibility mala kalte..aapan dev mhanje physically maansaashi compare karto..pun, maybe kaavyaat kinva puraanaat je lihile aahe te ajunach kahitari samjun lihile aahe..aata vaayu dev mhatla tar pruthvivaril sampoorna atmosphere asa nahi mhanu shakat ka? tar he vaayu dev, at the same time, kailas aani vaikuthaat (te jithehi asel tithe) asu shaktaat, nahi ka! tyaach prakare pratyek dev-devta he asech conceptualize kele astil..
tasach,he pan khoop interesting pt lihila aahes -" जेव्हा पृथ्वी समुद्रात बुडवली होती, तेव्हा विष्णूने अवतार घेउन तिला वाचवलं. आता जर पाणी फक्त पृथ्वीवरच अस्तित्त्वात आहे, तर हा आख्खाच्या आख्खा समुद्र आला कुठून? तो आहे कुठे? म्हणजे जर पृथ्वी बुडेल इतका जर समुद्र अस्तित्त्वात असेल तर तो आपल्याला सापडल्याशिवाय राहिला असता का? "
aata samjaa, akhkhya bhootalaavar poor aale(kinva pralay mhanat astil tyala) tar pruthvi samudraat budaalyaatach jamaa aahe, nahi ka! tar ajun kuthetari samudra asnyachi aavashyakta aahe ka? mag shri harinni yeun pruthvila hyaa avasthepaasun vachavle asel..actually ithe ajun ek pan drustikon ahe, je ajun aaplyala neet kallele/patlele nahi, te mhanje physical entity aani abstract entity..pruthvi mhanje fakt physical earth nasun tyashivaay ajunahi kahi aahe ase samjun puraanaat tase lihile asel kadachit..
anyway, jevha concepts timeline madhlya eka point paasun doosrya point la pass jhalet tevha te kiti faithfully reproduce jhalet kinva kiti distort jhalet hyabaddal aaplyala khoop kami kalpana ahe. aani mhanun mala vaatta kee puraan vagaire he research che vyavasthit topics ahet aani tyanvar research hoto suddha. tyanchyakadhun aapan khoop kahi shiku shakato.
pauranik serials vagaire baghtanna, tyaatle dialogues barechse kaavyaatle translate kelele asle tar, khoop interesting astaat..vichaar karaayla laavtaat aani khoop relevant pan vaatu shaktaat..besides, aataache contemporary serials tar kase astaat! tya peksha kuthlech serials nahi baghitlele parvadel..aani agdich kadhitari baghitla tar tu lihalayes tasa khoop entertainment hota he nakki :D
(comment khoopach laambla aahe :-|)
विनय, comment बद्दल धन्यवाद. तुझं म्हणणं अगदी खरं आहे. पौराणिक कथांमधे आदर्श जीवन जगण्यासाठी खूप काही विचार मांडून ठेवले आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहेत.
ReplyDeleteमुळात या सर्व गोष्टींची आवश्यकता का भासली, या पासून पुन्हा विचार करण्याची गरज आहे. याबाबतीत थोडा वेगळा विचार थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते.
पृथ्वीवर जीवसृष्टीचा उगम काही कोटी वर्षांपूर्वी झाला. उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यांपैकी एका टप्प्यात कधीतरी मनुष्यप्राण्याचा जन्म झाला. काळाबरोबर मनुष्य स्वतः उत्क्रांत होत गेला, प्रगती करत गेला. सुरुवातीला एकेकटा रहणारा हा प्राणी नन्तर समूहाने राहू लागला. त्यावेळी निसर्गात घडणार्या घडामोडींबद्दल, आपत्तींबद्दल माणसाला नेहमीच कुतुहल होते. या घटनांच्या पाठीमागच्या वैज्ञानिक कारणांबद्दलच्या अज्ञानामुळे कदाचित; सूर्य, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, निसर्ग, अशा अनेक देवता या घडामोडी घडवून आणतात, अशी संकल्पना अस्तित्वात आली असावी. आणि हे सहाजिकही आहे. अजूनही अनाकलनीय घटनांना देवाच्या नावाखाली खपवण्याचे प्रयोग कानावर पडत असतातच की आपल्या. तर अशा देवतांची पूजा न केल्यामुळे, त्याना न मानल्यामुळे आपले काहीतरी बरेवाईट घडू शकेल अशी समजूत करून देणे ही काही अवघड गोष्ट अजिबात नाही. शिवाय मनुष्य जसजसा प्रगत होत गेला, समाजात राहू लागला, तसतसे काही नीतीनियमांबद्दल संकेत (universal protocol?? :p) असण्याची आवश्यकता वाटू लागली. चोरी न करणे, समोरच्या माणसाचा आदर करणे, अशा छोट्या छोट्या संकेतांपासून सुरुवात झाली असू शकते. हे संकेत जो पाळतो तो चांगला, जो पाळत नाही तो वाईट. आता सगळ्यांनी हे संकेत पाळावे कसे? तर कसलीतरी भीती दाखवणं आवश्यक! मग जो हे सगळे नीतीनियम पाळतो, तो आदर्श. देव त्याचं भलं करतो, जो नाही त्याला देव शिक्षा करतो. वरदान/शाप यांचा उगम असा झाला असावा. दानव ही संकल्पनाही याच दरम्यान आली असावी. यम नियमांच्या या खेळामध्ये सुष्ट-दुष्ट, देव-दानव या संकल्पनांचा जन्म झाला, त्याना मूर्त स्वरूप मिळालं. आणि healthy सामाजिक जीवनासाठी आवश्यक अशा विचारांना तत्त्वज्ञान हे नाव मिळालं असावं. वेद, पुराणे, आणि इतर तत्सम ग्रंथांमागचा उद्देश हेच विचार highlight करणं हा आहे/असावा. फक्त ते जनतेच्या गळी उतरवण्यासाठी गोष्टींचा आधार घेतला गेला. मुळात आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट कर्माचं account maintain करणारा कुणीतरी वर बसलाय ह्या भीतीपोटी तरी माणसं वाईट कर्म करणार नाहीत (किंवा समाजाचे नीतीनियम तोडणार नाहीत असं म्हणू हवं तर..). आणि हे समाजहिताला पूरक आहे. एव्हढाच काय तो या सगळ्याच्या पाठीमागचा उद्देश असावा.
पुराणातल्या कथा अनेक पिढ्यांकरवी आपल्या पर्यंत येउन पोहोचल्या आहेत. यामधल्या काळात त्यामध्ये चिक्कार बदल झाले हे निश्चित. कारण आपल्या पर्यन्त येणार्या गोष्टीचा आपण प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार अर्थ काढत असतो. त्यामुळे हे बदल काही unexpected नाहीत.
वाईत एव्हढच वाटतं की जे विचार पोहोचवण्यासाठी या गोष्टी तयार झाल्या त्या आजकाल आपल्यापर्यंत येताना त्यातलं सार बाजूलाच राहतं आणि पोहोचतो तो फक्त चोथा.
बरं, आणि आता विज्ञानाने इतकी मजल गाठली आहे, बर्याचशा गोष्टी नव्याने समजल्या आहेत तर त्यादृष्टीने या गोष्टींमध्ये योग्य बदल व्ह्यायला हवेत. ते होताना दिसत नाहीत. उदाहरणार्थ, आता मनुष्य जन्म/ जीवसृष्टीचा जन्म याबद्दल बर्यापैकी उकल झाली आहे. तरीही आपण कथा ऐकताना ’मनू’ हा एकटाच प्रलयातून वाचला आणि त्यापासून या मनुष्यजातीची सुरुवात झाली वगैरे वगैरे गोष्टीच ऐकत रहतो. फक्त हिंदू धर्म/ पुराणच नव्हेत तर इतरही धर्मांना हे लागू आहे. हे सगळं थांबणार कधी?
मुळात हे सर्व विचार तत्त्वज्ञान जर सर्वसामान्य लोकांसाठी असेल, तर ते लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचायलच हवेत. ते फक्त काही researchers/ अभ्यासू मंडळींपुरतेच मर्यादित राहतात. सर्वसामान्यांच्या माथी येतो तो फक्त sugarcoated fantasized कथांचा भडिमार. त्यामुळे जेव्हा या मालिका बघितल्या जातात तेव्हा घटकाभराची करमणूक यापेक्षा जास्त उद्देश त्या serve करताना दिसत नाहीत. हाच काय तो आक्षेप.
marutichya shepataevdhi comment...:)
ReplyDelete@ Nachiket:- ha ha ha.. very true :D
ReplyDeleteMeghana, hahaha, tujha comment suddha ek lekh ach aahe, quantity peksha quality saathi! sahi lihiliyes :)
ReplyDeletetu jya goshti mhanat aahes, tya halu halu lokanparyant pochat aahetach..pan samaajaatlya vichaaraat badal, ha across generations hoto asa mala vaatta, aani te yevdha obviously aaplyala disat/kalat nahi. Pan, irrespective of all new findings, junya goshti badalnyachi garaj mala vaatat nahi. jyala jasa samjaaycha ahe tasa samju de. fakt aapan interpretations mould karu shakato, aani te pan vayyaktik paatlivar hona sopa aahe, samajik dhaarna badlaayla, kinva eka veglya point var yeun stabilize vhaayla khoop vel lagel.
aani kitihi interpretations kaadhlet, tari kuthla barobar ahe he agdi achuuk saangne shakya nahi. mulaat hya sarva sahityacha uddesh, tyapaathimaagchi khari ghatana suchavne nasun, kahi upayogi sandesh dene ahe aani te tu var tujhya comment madhe vyavasthit highlight kele aahes.
jo paryant aacharnaat he sagla yet nahi, to paryant aaplyala he sandesh nishfal ach vaattil. baryaachda aapan junya vidhaarna fetaalun navin kahi tari propose karto. aata asa aadhlun yeta ki science cha naav gheun, kinva rational asnyaacha bahana deun, loka barech liberties ghetaat aani jithe freeway milto tithe herd-instinct aslyasaarkhe sagle pataapataa paltaat. aani mag situation out of control jaayla laagta. tar aapan goshti kasha suchavto aani to kasa samajla jail te khoop mahatvaacha aahe, aani hyaatun toh reluctance yet asel findings lokanparyant pochavnyaat. zari aaplyala kuthetari chuuk aahe asa aadhlun aala, tari tee tashi kaa jhali aani tyamaagcha khara hetu kay hota, aani te tasa nasel tar kay hoil, he asle sagle vichaar kele pahijet...
(phew! mee kadhi yevdhe comments lihile nahit kuthe...'vinay chill' asa swatahala mhannyachi paali aaliye! hyapeksha to comic mood chaangla ahe tujhya original article cha :D)
@ Vinay: 'aata asa aadhlun yeta ki science cha naav gheun, kinva rational asnyaacha bahana deun, loka barech liberties ghetaat aani jithe freeway milto tithe herd-instinct aslyasaarkhe sagle pataapataa paltaat.' : absolutely right.
ReplyDeleteaamhala shalet asataanaa Janardan Waghamare yaancha 'Mahapurushaanchaa parabhav' naavachaa path hota. tyachi aathavan zali.