सध्या बर्याच पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरु आहे. आमच्या field station च्या अंगणातही कितीतरी संसार फुलले, आणि अजूनही फुलताहेत. त्यापैकी मुख्य उल्लेख करायचा म्हणजे 'purple sunbird'. चिमणीच्या निम्म्या आकाराएव्हढा हा छोटुकला पक्षी. अगदी टीचभर म्हणावा असा. पण अतिशय सुंदर, देखणा. एका जोडीने बागेतल्या एका तारेचा आधार घेउन घरटं बांधलय. अगदी वेगळंच, घरट्याला वरुन टोपी असल्यासारखं. वरुन अगदी ओबडधोबड दिसत असल तरी आतून मात्र अगदी मऊमऊ कापूस आहे.
परवा झालं काय, आम्हाला अचानकच एक डोकं त्या घरट्याच्या तोंडातून डोकावताना दिसलं. अगदी टुकूटुकू बघणारे दोन डोळे आम्हाला निरखत होते. अगदी छोटुले ते भिरभिरे डोळे पाहून आम्ही उड्याच मारल्या. इतका आनंद झाला होता आम्हाला. पण गंमत अशी की, आमच्या हालचाली टिपून ते पाखरू अचानक उडुन गेलं. आणि उडून गेल्यानंतर समजलं की आम्ही ज्याला पिल्लू समजत होतो, ती प्रत्यक्ष sunbird ची मादी होती आणि ती त्या घरट्यात अंडं ऊबवायला बसली होती. एक प्रकारे आमचा पोपटच झाला. तेव्हा फक्त डोक्याचा थोडासाच भाग दिसत असल्यामुळे असं झालं. खरच पूर्ण वाढ झालेला पक्षी इतका छोटा तर पिल्लू तर किती छोटं असेल? लवकरच कळेल !!
आणखी एका बुलबुलच्या जोडीनेही आपला संसार थाटला आहे. घरटं बांधायला अशी मोक्याची जागा शोधून काढली आहे, की कौतुकाची थाप मारावीशी वाटली त्याच्या पाठीवर! खरच, बाहेरुन बघितल तर कळणारच नाही अशा ठिकाणी Croton नावाच्या (हे माझं ज्ञान नव्हे, आमच्या इथल्या botanists च्या कृपेने हे नाव इथे लिहिलय. चुकलं असल्यास कं. ज. ना.!) झुडूपाच्या अगदी आतल्या बाजूला नाजूकशा फांद्यांच्या आधाराने बांधलय. अगदी साधंसच आहे. पण perfection म्हणजे काय हे शिकण्यासाठी त्यांच्याकडे class लावावा इतकं सुबक आहे. सध्या तरी तीन अंडी आहेत.
तर आम्ही उत्सुकतेनं वाट बघतोय सगळ्या पिल्लांची...P.S. १) कं. ज. ना.: कंपनी जबाबदार नाही!
२) अजुनही कळलं नाही?? मग व. पुं. चं infection नावाचं कथाकथन ऐका. नक्की कळेल!
३) हे कथाकथन internet वर मिळाल्यास मला नक्की कळवा. न मिळाल्यास कं. ज. ना!
awesome clicks, back home i clicked a butterfly in close distance... nice feeling!
ReplyDeleteकं. ज. ना mhanje kay?
@ nachiket: thanks! why don't you put them up on your blog??
ReplyDeleteare कं. ज. ना mhanje kahi nahi re.. timepass mhanun asa takalay.mhanje te zad olakhayala chukala asalyas jababdari mazi nahi :D
tu va pu chi kathakathan aikali aahes ka?
कंपनी जबाबदार नाही he vakyacha effect samajun ghenyasathi tula va pu yancha infection navacha kathakathan aikava lagael. tyamadhe ya vakyacha upayog khoop mast prakare kelay.
http://www.in.com/music/v-p-kale-kathakathan-vol-5/songs-76205.html
ithun tula he aikata yeil.
khaas!! mee talegaon la aalyavar pahilya don-teen mahinyaat sunbird, bulbul aani munia barech pahile hote aani majhi curiosity khoop vaadhleli..tyaat sunbird tar sahich distaat, khaas karun plumage madhe aalela purple aakarshak male. barech photos pan kaadhlet, pan gharta nahi shodhu shaklo. khara tar mee neet prayatnach kele nahit. tujha lekh vaachlyavar kutuhal ajun vaadhlay pratyakshaat gharta paahnyachi :)...
ReplyDeletehya varshi september yetaach munia parat aalet. bulbul tar varshabhar aahetach aani tyanchi 'bulbulsankhya' baryapaiki ahe..pan sunbird ajun maagchyavarshi itke disle nahiyet..hopefully aata disaayla laagtil..
lekh sachich ahe :) ...tumchya field station var yenyaachi khoop ichcha hote vaachun
कं. ज. ना. आवडलं.
ReplyDeleteमला एक शंका आहे, आपल्याकडे अमुक एक बाई स्वयंपाकात ’सुगरण’ आहे असं म्हणतात. सुगरण पक्ष्याबद्दल मला जे माहिती आहे, ते असं की तो पक्षी मादीला आकृष्ट करण्यासाठी सुंदर घरटं बांधतो. (खोप्यामधे खोपा सुगरणीचा चांगला - ऎक्चुअली तो खोपा नर सुगरणाचा असतो). ज्याचा खोपा सगळ्यात जास्त आवडेल त्याच्या खोप्यात मादी सुगरण रहायला जाते. मग तिचा आणि स्वयंपाकाचा काय संबंध. उलट घर बांधण्याच्या हिशोबानी बघायला गेलं, तर ’अमुक एक सिव्हिल इंजिनियर किंवा अमुक एक गवंडी घर बांधण्यात अगदी सुगरण आहे हो!!!!’ असं म्हणायला हवं.
@ Vinay: nakki ye Mudumalai la. khoop chaan jaaga aahe.
ReplyDelete@ Shantanu: 'Sugaran' pakshyala aadhi naav dila gela aahe ka swayampakachya babatit ha shabd pahilyanda vaparala gela ha basic prashna ahe.
aapan phakt swayampakachya contex madhe ha shabd vaparato. pan jar pakshyachya navavarun ha shabd adopt kela gela asel tar 'sugaran' mhanje 'changalya goshtinchi parakh asalea, utkrusht tech sweekaranaara' asa hou shakato.
in that way it makes sense. what say?
Sundar post ani photos.
ReplyDeleteReminded me of us listening to your excursions to Mudumalai :)