बऱ्याच दिवसांपासून स्वतःशीच स्वतःची तक्रार होती की काहीच वाचन होत नाहीये. वाटत होतं, कुठे गेले ते दिवस जेव्हा एखादं पुस्तक हातात पडायचा अवकाश, ते संपवल्याशिवाय चैन पडत नसे. एक रितेपणाची भावना पण उगाचच मनात दाटून येते अशावेळी. गेल्या आठवड्यात एक पुस्तक हातात पडलं आणि हे सगळे विचार कुठल्या कुठे पळून गेले.
जावेद अख्तर यांचा कवितासंग्रह- तरकश. उर्दू-हिंदी या मूळ भाषेतल हे पुस्तक कितीतरी इतर भाषांमध्ये अनुवादित झालय. अगदी मराठीत सुध्दा! इतर भाषांतल्या अनुवादाचं माहित नाही, पण मूळ भाषेचा गोडवा वेड लावणारा आहे हे नक्की.
कुठल्याही कलाकाराच्या कलेच्या सादरीकरणामध्ये त्याच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अनुभवांचा खूप मोठा पगडा असतो असं मला नेहमीच वाटत आलंय. एका प्रख्यात गायिकेने तिच्या एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की ज्या व्यक्तीच्या वाट्याला दुःख आलं नाहीये अशी व्यक्ती मोठा कलाकार होऊच शकत नाही. पुस्तकाच्या सुरुवातीलाच जावेद 'अपने बारे में' असं म्हणून आपल्या आयुष्याची छोटीशी झलक देतात. अतिशय सहज साध्या सोप्या भाषेत समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्याच्या सुरात लिहिलेले आत्मकथन एक वेगळाच अनुभव देऊन जाते.प्रसिद्धीच्या वलयात वावरणाऱ्या या व्यक्तीच आयुष्य किती वेगळ्या अनुभवांतून गेलंय! सुरुवातीच्या या आत्मकथनामुळे संग्रहातली कुठलीही कविता वाचताना जावेद अक्षरशः उलगडत जातात, जणूकाही एखाद्याच्या मनापुढे आरसा ठेवला असता आपण त्या व्यक्तीच्या मनातलं लख्खपणे वाचू शकू असं...
'तरकश' म्हणजे 'Quiver'- बाणांचा भाता. या संग्रहातल्या बहुतेक कविता, गझल, शेर हे खरोखर या संग्रहाच नावं सार्थ करणारे आहेत. सगळ्याच कलाकृती भावातीलच असं नाही, पण जे भावतं ते मनात घुसून घर करून राहण्यासारखं आहे.
मला आवडलेल्या सगळ्या गोष्टी इथे लिहिणं शक्य नाहीये. पण तरीही काही उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही.
***
ऊँची इमारतों से मकां मेरा घिर गया
कुछ लोग मेरे हिस्से का सूरज भी खा गए
***
जुन्या घराच्या आठवणींबद्दल लिहिलेली 'वो कमरा याद आता है' ही अशीच एक अप्रतिम कविता.
या कवितेच्या शेवटी ते म्हणतात,
मैं अब जिस घर में रहता हूँ
बहुत ही खूबसूरत है
मगर अकसर यहाँ ख़ामोश बैठा याद करता हूँ
वो कमरा बात करता था
**
संघर्षाच्या काळामध्ये जेव्हा हातातोंडाची गाठ पडायची मुश्कील होती या दिवसांबद्दल लिहिताना ते म्हणतात-
रोटी एक चाँद है और हालात बादल.. चाँद कभी छुप जाता है, कभी दिखाई देता है
'भूख' ही कविता अशीच अक्षरशः काटा आणणारी आहे.
**
'एक मोहरे का सफर' , 'वक्त' आणि अशा अनामिक कितीतरी. उल्लेख करावा तितका कमीच आहे.
ही पण मला भावलेली अशीच एक अनामिक गझल.
या पूर्ण कवितासंग्रहाच स्वतः जावेद अख्तर यांच्या आवाजातलं अभिवाचन you-tube वर available
आहे. परंतु पुस्तकाच्या मानाने अभिवाचन जरा एकसुरी वाटलं. माझ्या मते, पुस्तक वाचताना जास्त मजा येते. निदान मला तरी पुस्तक जास्त आवडलं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कठीण शब्दांचे अर्थ शक्य तिथे दिले आहेत या पुस्तकात! मिळालं तर नक्की वाचा!