Thursday, May 27, 2010

उन्हाळा आणि आंबे

हा पहिलाच असा उन्हाळा आहे की जेव्हा मी आंबे, आमरस आणि आईस्क्रीम यापैकी काहीही खाल्लं नाहीये.... गेले कित्येक दिवस मला हापूस आंबे खायची जबरदस्त इच्छा होतेय. पण काय करणार, इथे खास असे आंबे बाजारात दिसत नाहीत..टिपिकल पुणेरी असल्याने 'पुण्याच्या आंब्यांची चव कश्शा कश्शाला नाही हो...' असं म्हणायची संधीही मला सोडायची नव्हती.. पण औषधालाही आंबा दिसला नाही तर मग काय करता हो?? इथले लोक आंब्यांशिवाय जगूच कसे शकतात मुळी हा मला पडलेला मुख्य प्रश्न आहे. ( अर्थात, मी अजून जिवंत आहे यावरून 'आंब्यांशिवाय जगता येत' यावर मला विश्वास ठेवावाच लागत आहे..:)


आणि हापूस ला नावं ठेवणारे पण लोक बघितले बर का!! अजबच आहे म्हणा की ही दुनिया...दुपारची कडक उन्हाची वेळ, डोक्यावरती गरगरता पंखा, हापूस आंब्याच्या रसाची वाटी, तीही अगदी काठोकाठ भरलेली, सोबत गरमागरम पोळी आणि फ्रीज मध्ये दुपारी उन्हं उतरताना पिण्यासाठी म्हणून ठेवलेलं कैरीचा पन्ह, आहाहा ... उन्हाळ्याची खरी मजा यातच नाही का?

पण सध्यातरी यापैकी इथे काहीच नाही.. फक्त स्वप्नातही मला येणारा तो आंब्यांचा वास मात्र माझ्या सोबतीला सदैव असतो...

Saturday, May 22, 2010

लफ़्ज आजकल मुझसे कुछ रूठ गए हैं..
न जाने कहाँ जाके छुप गए हैं..

तनहाई में भी राह देखती रहती हूँ उनकी..

मगर वह ज़ालिम कुछ ऐसे हैं की
यूं लुक्काछुपी में मज़े ले रहे हैं..

ए लफ़्जों, मुझे ऐसे न सताया करो..
मेरी मर्जी हो न हो
रोज मेरी गली आया करो..

ज़िन्दगी का रास्ता तो अकेले चलना ही पड़ेगा मुझे..
कम से कम तुम्हारे साथ का झूठा ही सही
लालच दिखाया करो...

Saturday, May 8, 2010

Mere saath rehta tha Ek saaya mera
Magar aaj kal hum alag ho gaye hai

Usse ye shikayat thi mujhse
ki usse mitaane ki khaatir hi main yoon
andheron mein chala karta hoon
Taki woh mera T'aakub na kar paaye magar

Mujhe ye shikayat thi ki
Main Ujaalon mein to akela bhi chal sakta tha
Magar Andheron mein jab mujhe jarurat thi ek ahbaab ki
to woh gaayab tha, uska nishaan tak na baaki tha.

Mere saath rehta tha saaya mera
Shareek-E-Hayaat aur saathi mera
Magar aajkal hum alag ho gaye hai!

-Gulzar

Saturday, May 1, 2010

सोबत


पालटले आहेत दिवस तुझे..
देण्यासारखं आता तुझ्याजवळ काहीच नाही उरलं...
द्यायला होतं तेव्हा खूप काही दिलंस तू..
अगदी कसलाही विचार न करता

आता नशीबच फिरलं आहे जणू
कुणीच उरलं नाही तुझ्या साथीला..
पण मी मात्र विसरलो नाहीये तुला.
विसरू तरी कसा शकतो मी?
तुझ्याच तर अंगाखांद्यावर खेळलो, वाढलो.
उंच आभाळात झेप घ्यायला शिकलो.

गेले त्यांना जाऊ देत,
मी मात्र तुझ्याबरोबरच राहीन..
पुढच्या पावसाची वाट बघत .. सदैव..

P.S. @ Deep, sorry again. I started writing this post in english, switched to hindi; but ended up in marathi again. It is much easier to put my feelings in marathi. :(