हे पुस्तक मी किती वेळा वाचलंय मला आठवत नाही. अर्थात हे पुस्तक किती वेळा वाचलं, हे मोजावं लागण्याच्या पलीकडच आहे. प्रत्येक वेळेला वाचताना डोळ्यात पाणी उभं करण्याची ताकद या पुस्तकात आहे. ही कहाणी आहे परवाना या एका अफगाण मुलीची. तालिबानची दहशत, युद्ध, बॉम्बस्फोटांचे आवाज या पार्श्वभूमीवर जन्माला आलेल्या मुलांचं आयुष्य किती वेगळं असू शकतं? आपण फक्त कल्पनाच करू शकतो किंवा खर तर कल्पनाही नाही करू शकत..
आपल्या वडिलांना तालिबानी लोकांनी पकडून नेलंय या धक्क्याने तुटून गेलेली परवाना, आपल्या घरातल्या इतर लोकांकडे बघून सिद्ध होते एक धाडस करायला.. कुटुंबाला जगवण्यासाठी तिला हे करावंच लागतं.. स्वतःचे केस कापून, मुलाचे कपडे घालून अकरा वर्षाची ही छोटी मुलगी बाहेरच्या जगात पाऊल टाकते. तिचं 'बाई' पण इतरांच्या लक्षात आणू न देता सगळं जमवण्याची कसोटीच जणू. पैसे कमावण्यासाठी तरी काय काय करावं तिने? थडगी खणून माणसांची हाडे विकायला लागली तिला.. या पुस्तकातलं एक वाक्य वाचताना माझा नेहमी थरकाप उडतो..परवानाच्या आईला जेव्हा हा प्रकार कळतो तेव्हा ती विषादान म्हणते, "काय आपल्या देशाची अवस्था झालीय,, असं दुर्दैव कधी कुणावर ओढवलं नसेल.मुलाबाळांना खाऊ घालायचं तर वाडवडिलांची हाडे खणून काढायची वेळ आलीय आपल्यावर!!"
या पुस्तकाच्या मराठी भाषांतरकार मनोगत व्यक्त करताना म्हणतात की, युद्धाच्या प्रासंगिक खुमखुमीन अधून मधून उन्मत्त होणाऱ्या आपल्या आणि शेजाराच्याही देशातल्या प्रत्येकाला परवाना भेटावी, बॉम्बगोळ्यांच्या भडक्यात जाळून जाळून वांझ झालेल्या जमिनीत सुंदर फुलांच नाजूक रोपटं रुजवण्याचा तिचं स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकाला बघता यावं, 'शहाणपण' नसेल, तर किमान 'समज' तरी यावी.
एव्हढं सगळं भयंकर, भीषण आयुष्य रोज, क्षणोक्षणी जगात असतानाही परवानाच्या मनातला असलेला आशावाद सतत जाणवत राहतो. तिचं आणि तिच्या मैत्रिणीच एक साधं, शांत सरळ आयुष्य जगण्याच स्वप्न मनाला सतत बोच देत राहत. साधं, सरळ, शांत जगण्याचही स्वप्न पहावं लागावं??
अर्थात परवाना सारखेच आणखी कितीतरी लोक असतील या जगात..आपल्याला सहज उपलब्ध असलेल्या गोष्टीही त्यांना स्वप्नवतच असतील.. आपण कुठे आहोत त्यांच्या तुलनेत? किती छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करत बसतो आपण. आपण असतो आपल्याच कोषात. म्हणूनच असं आपल्याला आपल्या कोषातून बाहेर काढण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्यात जरा डोकावून पाहायला लावणारं हे एक बेस्ट पुस्तक....my all time favorite.

P.S. ही पोस्ट लिहिताना जाणवत होत की खरच याबद्दल लिहिणं किती अवघड आहे.. काय आणि किती लिहिणार.. मुख्य म्हणजे कसं लिहिणार.. शब्द तोकडे पडतात. breadwinner हे नाव सार्थ करणार हे पुस्तक आणि ही कहाणी.. वाचलं नसेल तर नक्की वाचा..