Sunday, August 15, 2010

ये तुम्हारी मेरी बातें, हमेशा यूहीं ...


आज माझ्या ब्लॉगचा वाढदिवस. ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा असं वाटलही नव्हतं की तब्बल वर्षभर माझा उत्साह टिकेल. आधीच आहेत की खंडीभर ब्लॉग्स, त्यात आणखी एकाची भर कशाला? इथे लोक किती उत्तम प्रकारे लिहू शकतात, वेगवेगळ्या विषयांवर मतं मांडतात, हे बघून खूप भारी वाटायचं, पण मला कितपत जमेल याची शंका होती. पण लिहितानाच स्वतःसाठी लिहायचं, हे ठरवलं, म्हटलं, लिहून तर बघू आणि सुरुवात केली. डोक्यातले विचार कागदावर उतरवायच्या ऐवजी इथे मांडायचे एवढाच काय तो फरक. कुणी वाचेल अशी अपेक्षाही नव्हती. पण मीच लिहिलेलं मीच कितितरी वेळेला वाचत बसायचे(आजही वाचते ..)     ( traffic fidjit apply केल्यावर जाणवलं की इतरांपेक्षा मीच माझा ब्लॊग जास्त वाचते :-) )
आज काही जणं माझा ब्लॉग वाचतात, पसंतीची पावती देतात. त्यांच्यापैकी कित्येक जणांनी मला आणि मी त्यांना बघितलही नाहीये, पण तरीही आम्ही संपर्कात आलोय ते यामुळेच. त्यामुळेच मला खूप छान वाटतय, काहीतरी चांगली गोष्ट केल्याचं समाधान मिळतय.
मी लिहिणं enjoy  करते, हे जेव्हा मला जाणवलं तो माझ्यासाठी एक सुखद धक्का होता. पण त्याचबरोबर माझ्यातले बरेचसे दोषही माझ्या लक्षात आले. जरी मला लिहायला आवडत असलं तरी कुठल्याही विषयावर लिहिणं मात्र जमत नाही. मला जे अगदी खूप भावतं, ज्याच्याशी मी स्वतःला relate करू शकते, तेच लिहू शकते. त्यातही डोक्यातले विचार प्रत्यक्षात उतरताना इतके बदलत असतात की लिहिल्यानंतर जाणवतं की मला जसं लिहायचं होतं त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या रुपात ते अवतरलेत! बर्‍याचदा असं होतं की योग्य शब्दच सापडत नाहीत, मग उगाचच  repalcement  करायची म्हणून केली जाते आणि त्यामुळेच ’म्हणायचं होतं एक...’ अशी गत नेहमी होते. भाषेचं महत्त्व खरोखर तेव्हा जाणवतं जेव्हा मनातले विचार मांडताना, व्यक्त करताना आपल्याला असमर्थ वाटतं. आणि तेव्हा कळतं की किती मजल अजून गाठायची आहे...
आज मी जेव्हा माझ्या सगळ्या मागच्या posts बघितल्या तेव्हा मला जाणवलं, की बहुतेककरून त्या सगळ्यांमधे उदासी, एकलकोंडेपणा, negativity अशाच भावना जास्त करून reflect झाल्या आहेत. असं का व्हावं? गेल्या वर्षात काय फक्त negative गोष्टीच जास्त घडल्या की काय? की अशा गोष्टींचाच माझ्यावर जास्त पटकन परिणाम होतो? विचार करताना जाणवलं की असं काही नाहीये. मूड चांगला असताना, आनंदी असताना तर सगळेच असतात आजूबाजूला, त्यांच्याशी चांगल्या गोष्टी share करताना काही वाटत नाही. पण कधी कधी आपला मूड चांगला नसताना, आपल्या मनातला सगळा कढ उतरवण्यासाठी, आपलं सगळच्या सगळ म्हणणं ऐकून घेण्यासाठी कुणीतरी हवं असतं. समोरच्याकडून सल्ल्याची अपेक्षा अजिबातच नसते, किंबहुना नाही मिळाला तरच उत्तम!   
फक्त मन हलकं होण्याशी कारण. अशी जागा मला माझ्या ब्लॊग्च्या रुपात मिळाली आहे, मन मोकळं करण्यासाठी!!
हा सगळा संवादच आहे, माझा माझ्याशी चाललेला, आणि त्याचबरोबर इतरांशीही...हा संवाद यापुढेही असाच चालू राहील अशी आशा आहे...
खुशनसीब समझते हैं हम खुद को,
आप से यूं मुलाकात हो गयी

दो चार बातों में गुज़रा ये वक्त
हमें हमेशा याद रहेगा, 
हमारी ज़िन्दगी के कुछ पन्ने 
अब आप के हवाले किये है हमने

पलटेंगे जब हम हमारी यह किताब
बीते पलों की ये दास्तां 
जाने कौन कौन से रंग दिखलायेगी

देख सकेंगे हम यह अपनीही दुनिया
किसी और नज़रिये से...
क्या पता,
अभी रुलानेवाले पल शायद 
हमेंही हसायेंगे कल 

बहुत सम्भलकर रखना इन्हें, 
कही गुम न हो जाये..
थामी है तुम्हारे हाथों में यह कहानी 
आखिर बडे विश्वास के साथ 
देखो, कहीं विश्वास टूट न जाये....

3 comments:

 1. अभिनंदन !!!!!
  @traffic fidjit::):):)

  ReplyDelete
 2. लेट लतिफ तरी किती असायचे पण असू दे... शुभेच्छा मनातल्या मनात राहून जायला नकोत. :) अनेक अनेक शुभेच्छा!

  ReplyDelete
 3. @ Bhanas: khoop khoop aabhar. blog varati aapale swagat aahe.

  ReplyDelete