अरुणा शानभाग. खरं तर हे नाव माझ्या जास्त परिचयाचं असण्याचं काही कारण नाही. तिचं अस्तित्व माझ्यासाठी एका वर्तमानपत्रातल्या बातमीपुरतं मर्यादित आहे, किंवा आता होतं म्हणावं लागेल. तिच्या आयुष्यावर बेतलेली 'अरुणाज स्टोरी' मी वाचलेलं नाही. माझा जन्म झाला तेव्हा तिच्यावर बलात्कार होण्याच्या घटनेला एक तप उलटून गेलं होतं. आयुष्यातल्या ६५ वर्षांपैकी तब्बल ४२ वर्षे कोमा मध्ये गेलेल्या अरुणा ची मृत्यूने अखेर सुटका केली. तिचं जाणं मनाला चटका लावून तर गेलंच, पण त्याबरोबर कितीतरी प्रश्नांचं काहूर माझ्यापाशी ठेवून गेलं. स्वतः न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा किती भोगावी लागावी याला काही मर्यादा आहे? दयामरणाचा हक्क असणे बरोबर की चूक याबद्दल विचार करणारी मी कोण? पण रोज तीळ तीळ मरण्यापेक्षा, एकदाच काय ते मरण येऊन गेलेलं बरं का नाही? असा विचार नक्कीच मनात खुपत रहातो. आज तिच्या कायदेशीर मृत्यूची बातमी वाचताना 'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' हे सुरेश भटांचे शब्द या परिस्थितीत किती चपखल बसतात हे जाणवत होतं.
ई सकाळ वर ही बातमी वाचताना सहज वरच्या कोपरयाकडे लक्ष गेलं. '41 likes and 314 dislikes'.
मी कुठे क्लिक करावं? कुणाच्याही निधनाच्या बातमीला 'Like' कसं करणार म्हणून 'Dislike'; की एका तडफडत्या आत्म्याची अखेर सुटका झाल्याचं बरं वाटलं म्हणून 'Like'?
मला उत्तर अजून सापडलं नाहीये.
ई सकाळ वर ही बातमी वाचताना सहज वरच्या कोपरयाकडे लक्ष गेलं. '41 likes and 314 dislikes'.
मी कुठे क्लिक करावं? कुणाच्याही निधनाच्या बातमीला 'Like' कसं करणार म्हणून 'Dislike'; की एका तडफडत्या आत्म्याची अखेर सुटका झाल्याचं बरं वाटलं म्हणून 'Like'?
मला उत्तर अजून सापडलं नाहीये.
Ha mudda kharach khup complicated ahe. Nakki jivanta asne mhanje kay itpasun prashna ahe mala. Nusta swas chalu asel kinva brain activity asel tar te enough ahe ka?? Mala tari nahi vatat. Recently "Still Alice: navacha ek apratim movie pahila...tikde pan mercy killing cha mudda nighala hota. Baki konacha mahit nahi, but i think i'd rather be dead that be a constant source of sadness and helplessness to my family....konavar burden asnyapeksha, jivanta naslela bara.
ReplyDeleteNice post Meghana! :)
kharach Namrata, asa jaganyapeksha melela kay vait asa vatatach. pan ekikade hehi vatata ki asa aaplya jaganyacha hakka dusara koni hiravun kasa gheu shakto? especially asha case madhe jithe tila swataha la kay vatatay he samorachyaparyant pohochavta yet nahi. tila swataha la jaganyachi ichcha nasati tar itake varsh tine fight marlich nasati, nahi ka?
Deleteadhich sangun Takte ki mala daya-maraN, ichha-maraN paTta. asayla hava asa waTta. pan mag asa hi wichar yeto ki aplyala sangitlela asta, je paap-punya apan karto tyacha fal milta. hya janmat nahi tar pudhchya janmat nakki. mag bhog bhogat astana asa paTkan ayushya sampavla tar pudhchya janmi hech bhog punha nashibi yenar ka?
ReplyDeletepaap punyacha mudda tar mi vicharat ghetalach navhata.. mala nahi vatat ya var mi kahi bolu shaken :)
Delete