Monday, March 15, 2010

नववर्षाच्या निमित्ताने.......

नवीन आले वर्ष तरीही
जुन्या क्षणांना न च विसरावे...
अनुभवाचे गाठोडे घेउनी संगती
पाऊल आपुले पुढे टाकावे

जरा थबकुनी नव्या वळणावर
हळूच मागे वळून पाहावे
भले बुरे जे घडून गेले
त्यावर अपुले मार्ग ठरावे

नव्या आकांक्षांना फुटावी पालवी
नव क्षितीजांचे स्वप्न पाहावे
झेप घेता उंच आभाळी
पाऊल मात्र धरतीवर असावे

3 comments:

 1. अगदी छान जमली आहे कविता !!!!
  कालच बोलत नव्हतो का फक्त डॉक्टर नाही लिहिणारे डॉक्टर असले म्हणजे नक्की तेच ..????
  अगदी तसच ,फक्त statistician नाही तर कविता करणारे statistician म्हणजे कोण .????????
  कसं कसं अगदी बरोबर ओळखलं की.. हाय काय नाय काय :)
  बेस्ट लक लक फॉर युवर नेक्स्ट poem
  नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!!

  ReplyDelete
 2. nav-varshachya shubheccha(360 divas agodar)

  ReplyDelete
 3. @ Meera & Nachiket.. tumhalahi navin varshachya shubhechcha!!

  ReplyDelete