Thursday, May 27, 2010

उन्हाळा आणि आंबे

हा पहिलाच असा उन्हाळा आहे की जेव्हा मी आंबे, आमरस आणि आईस्क्रीम यापैकी काहीही खाल्लं नाहीये.... गेले कित्येक दिवस मला हापूस आंबे खायची जबरदस्त इच्छा होतेय. पण काय करणार, इथे खास असे आंबे बाजारात दिसत नाहीत..टिपिकल पुणेरी असल्याने 'पुण्याच्या आंब्यांची चव कश्शा कश्शाला नाही हो...' असं म्हणायची संधीही मला सोडायची नव्हती.. पण औषधालाही आंबा दिसला नाही तर मग काय करता हो?? इथले लोक आंब्यांशिवाय जगूच कसे शकतात मुळी हा मला पडलेला मुख्य प्रश्न आहे. ( अर्थात, मी अजून जिवंत आहे यावरून 'आंब्यांशिवाय जगता येत' यावर मला विश्वास ठेवावाच लागत आहे..:)


आणि हापूस ला नावं ठेवणारे पण लोक बघितले बर का!! अजबच आहे म्हणा की ही दुनिया...



दुपारची कडक उन्हाची वेळ, डोक्यावरती गरगरता पंखा, हापूस आंब्याच्या रसाची वाटी, तीही अगदी काठोकाठ भरलेली, सोबत गरमागरम पोळी आणि फ्रीज मध्ये दुपारी उन्हं उतरताना पिण्यासाठी म्हणून ठेवलेलं कैरीचा पन्ह, आहाहा ... उन्हाळ्याची खरी मजा यातच नाही का?

पण सध्यातरी यापैकी इथे काहीच नाही.. फक्त स्वप्नातही मला येणारा तो आंब्यांचा वास मात्र माझ्या सोबतीला सदैव असतो...

2 comments:

  1. हाहा हा ...त्याचासाठी घरी असावे लागते . मी तर सद्धया आंबे अणि ice creame सोडून काही खातच नाहीये .

    ReplyDelete
  2. @ नचिकेत :हा बरोबर आहे तूझं ,त्यासाठी घरी असावं लागतं..
    हो आणि तुझ्यासाठी खास नगरचे गावरान आंबे किती छान असतात ना !!!!!!

    ReplyDelete