Tuesday, February 16, 2010

फजिती

इथे बंगलोर मध्ये कधी कुठे मराठी माणस भेटतील ते सांगता येत नाही. फार जपून वागावं लागतं!! मुदुमलाईला असताना याची भीती अजिबातच नव्हती. एक तर तिथे हिंदी समजणारी माणसच दुर्मिळ, मग मराठीची काय कथा?? मग आम्ही दोघीच आपल्या आमची करमणूक करून घेण्यासाठी काहीतरी काहीतरी उद्योग करत राहायचो. मोठमोठ्याने गाणी म्हणणं हा आमचा एक आवडता उद्योग होता. मग झालाच तर तमिळ पिक्चर्स बघताना जिथे जमेल तिथे मराठीतून dialogs transalate करणं (शक्य तितक्या मजेशीरपणे..), आणि येत जाता सतत काहीतरी comments करणं हे खूप व्हायचं... आमची भाषा कुणालाही समजत नसल्यामुळे आम्ही फारच निर्धास्त असायचो. अगदी लावण्यांसकट गाणी आम्ही येत जाता केव्हाही म्हणायचो. मजा यायची!!
पण इथे आलो आणि सगळा चित्रच बदललं. इथे पावलापावलावर मराठी माणस भेटत राहतात सतत.. त्यामुळे कधी, कोण, कुठे, कुठल्या परिस्थितीत मराठी समजणारा माणूस भेटेल ते सांगता येत नाही. परवाही अगदी असंच झालं.
आम्ही कुठेतरी बसने जात होतो. तिकिटासाठी सुट्टे पैसे आमच्याकडे नव्हते. शंभराची नोट कंडक्टर पुढे सरकावताच त्याने सुट्ट्या पैशाची मागणी केली. आम्ही नाही म्हणाल्यावर त्याने आम्हाला तिकीट आणि पैसे दिले खरे.. पण त्यातली एक नोट सेलोटेपने चिकटवलेली होती. मी त्याला दुसरी नोट मागताच तो वैतागला आणि आम्हीच सुट्टे पैसे द्यावेत म्हणून त्याने सांगितलं. आता आली का पंचाईत!! तसे अगदीच पैसे नव्हते असा नाही पण उगाच रुपया दोन रुपये अशी चिल्लर जमवून द्यावी लागणार होते. मी वैतागले आणि मैत्रिणीला म्हणाले.. थांब, आता त्याला सगळी पन्नास पैशाचीच नाणी देऊयात असतील नसतील तेव्हढी आपल्याकडे. बस म्हणावं मोजत. असा आमचं संभाषण सुरु होतं. पण अर्थातच इतकी पन्नास पैशाची नाणी नसल्यामुळे आम्हाला काही हा सूड घेता आला नाही. :( शेवटी मुकाट्याने पैसे जमा करून तिकीट घेतलं आणि चूप बसलो. आमचा उतरण्याचा थांबा जवळ येत असताना आम्ही हळूहळू उतरण्याची तयारी सुरु केली. तेव्हा त्याने हाक मारून आम्हाला सांगितलं (अर्थातच मराठीतून) कि तुमचा stop पुढे आहे, हा नाही. त्यामुळे जरा थांबा.. मराठीतून त्याला बोलताना ऐकून माझी जी गत झाली ती काय सांगावी.. इतका वेळ मी त्या conductor च्या नावाने काही बाही बोलले होते.. की कसा वैतागच आहे आणि मघाचे पन्नास पैशाची शोधाशोध करताना तर तो आमच्या जवळच उभा होता..मला काय बोलाव तेच सुचेना!! मग आम्ही विचारल्यावर त्याने सांगितलं की तो सोलापूरकडचा आहे.. बरीच वर्ष कामाच्या निमित्ताने बंगलोरला राहिल्यामुळे कन्नड तर उत्तम येतंच होतं. पण मराठीही चांगलाच बोलत होता. त्यानेच मग आम्हाला जिथे उतरायचं होतं तिथला नीट पत्ता वगैरे सांगून आमची बोळवण केली.
इथून पुढे जरा पब्लिक मध्ये जपून बोलायचं असा ठरवूनच आम्ही पुढच्या मार्गाला लागलो..

2 comments:

  1. हाय काय नाय काय !!!!!
    तुला आठवतं ना आपण इस्कॉन ला गेलो होतो तेंव्हाचा प्रसंग ..
    माझे तर धाबेच दणाणले ,त्यानंतर मला तेंव्हा तिथे काहीच सुचत नव्हत...

    ReplyDelete
  2. pan kharach maja yete jevha marathi manus dur kuthetari bhetato teva...pan ethe matra kharach tuzi phajiti zali

    ReplyDelete